लग्न लावून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक ; तीन दिवसांची पोलीस कोठडी ;


अमळनेर –
शहादा तालुक्यातील मंदाणे येथून नवरदेव मुलाकडून १ लाख ३० हजार रुपये रोख घेऊन लग्न करून ९ दिवसात पलायन करून श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे १५ व्या दिवशी पुन्हा पढावद ता शिंदखेडा येथील रहिवासी हल्ली मुक्काम सुरतच्या युवकाशी दुसरे लग्न करणारी नवरी मुलीसह, आई, मामा, मावशी , भाऊ व तीन दलाल अशा आठ जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात संगनमताने लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना पोलिसांनी कालच ताब्यात घेऊन अटक केली होते.
मात्र यातून नवरीचा भाऊ, आई व तीन लोक फरार झाले होते, त्यातील आईला काल शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत , पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार विश्वास साळुंखे महिला पोलीस कल्पना पाटील यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातून अटक केली व पाचही जणांना शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
मंदाणे ता शहादा येथील भूषण संतोष सैदाने याच्याशी १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम घेऊन दिनांक ६ मे रोजी करून १५ मेला पतीच्या घरातून पळून गेली अशी तक्रार दिनांक १६ रोजी दाखल झाल्याने पोलिसांचा तपास सुरू असतानाच काल दिनांक २१ रोजी पुन्हा एक लाख रुपये घेऊन लग्न झाल्यावर ५० हजार रुपये घेण्याचा मौखिक बोलीवर दुसरे लग्न सुनील माणिक पाटील राहणार सुरत मेन रोड हल्ली मुक्काम पढावद याच्याशी कपिलेश्वर मंदिरस्थळी केले. लग्नास शहादा येथील तक्रारदार भूषणचा नातेवाईक उपस्थित होता त्याने भूषणला नवरी मुलीचा फोटो काढून पाठवला तर पळुन गेलेली पत्नी दुसरे लग्न करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शहादा पोलिसांना कळविले त्यानुसार मारवड पोलिसांना कळवून कपिलेश्वर मंदिर वरून मुडावद मार्गे शोध घेत पढावद येथे नवरी मुलीसह ,मामा मावशी व संशयित म्हणून ईतर तीन अशा सहा जणांना पकडले मात्र मुलीची आई, भाऊ व दलाल असे पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तेथून नरडाणा पोलिसांनी त्यांना शहादा पोलिसांना वर्ग केले तेथे तेथे पिडीत पती भूषण संतोष सैदाने यांनी वरील प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा १ लाख ३० हजार रुपये रोख घेऊन लग्न करून ९ दिवसात पळून जाणारी पत्नी १) सोन राजू शिंदे, २) सासू वंदनाबाई राजू शिंदे,
३) शालक भैरव राजू शिंदे, तिन्ही राहणार हिंगोली तर ४) मामे सासरे योगेश संजय साठे राहणार अकोला, ५) दलाल पूजा प्रकाश साळवे, ६) प्रीती राजेश कांबळे दोन्ही राहणार हिंगोली, ७) बाबाराव आमले राहणार औरंगाबाद, ८) रविंद्र गयभू गोपाळ राहणार कुंभारी बुद्रुक ता जामनेर यांनी पैसे घेऊन संगनमताने लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी शहादा पोलीस ठाण्यात आरोपींना घेऊन आल्यावर रात्री उशिरा दाखल केला.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पत्नी सोनू ,सासू वंदनाबाई, मामा योगेश ,मावशी पूजा व दलाल या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे , तर फरार तिन्ही आरोपींना व साथीदारांचा शोध सुरू असून लवकर पोलीस पकडतील असे तपासी अधिकारी पीएसआय सुरेश सोनवणे यांनी बातमीदारशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *