जळगाव –
महाराष्ट्र पर्यावरण सखी मंच समितीची जळगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव तालुका अध्यक्षपदी सौ. मनिषा शैलेश शिरसाठ व सचिव म्हणून रुद्राणी देवरे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सामाजिक व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष वनमित्र आबासाहेब मोरे, राज्य समन्वयक नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यावरण सखी मंच समिती जळगाव जिल्हाध्यक्षा नयना पाटील व कार्याध्यक्षा मनीषा पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष सौ. अर्चना जयंत महाजन, डॉ. सौ. भावना चौधरी, कार्याध्यक्ष वैशाली रमेश बाविस्कर, सहसचिव कामिनी प्रफुल्ल पाटील, कोषाध्यक्ष वैशाली भिला पाटील, सहकोषाध्यक्ष गौरी सपकाळे, कायदेशीर सल्लागार सुनंदा कोळी, माधवी वाघ गरुड, तज्ञ मार्गदर्शक ज्योती लालापुरे, नीलिमा नारखेडे, सल्लागार सदस्य विद्या चौधरी, अर्चना गरुड, रेखा सपकाळे, भाग्यश्री बाविस्कर, महाविद्यालयीन प्रमुख प्रतिभा निकम अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. झाडे लावणे व संवर्धन करणे सोबतच आयुर्वेदिक रोपांची बाग, पशुपक्ष्यांसाठी कार्य, आरोग्य म्हणून योग प्राणायाम कार्य अशी नानाविध कार्यक्रम कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.



