भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द अनिल कुलकर्णी यांची निवड झाली आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या शिफारसीवरुन त्यांच्या खासदार कोट्यातून पुढील दोन वर्षासाठी ही निवड करण्यात आली. शहरासह विभागातील रेल्वे प्रवाशांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहू. या माध्यमातून प्रवाशांना रेल्वेकडून अधिकाधिक सेवा, सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करु, असे यावेळी नवनियुक्त डीआरयुसीसी सदस्य अनिरुध्द कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी अभिनंदन केले.



