जेष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक – दीपक धांडे ;शिवसेना विभागीय कार्यालयात जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या काळात जेष्ठ नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे तसेच त्यांना ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती, लाभ समजून घेतले तर त्यांचा उपयोग करणे शक्य होईल. सरकारच्या या योजनांचा किंवा लाभांचा उपयोग केला तर कोणत्याही आर्थिक स्थितीतील ज्येष्ठांचे जगणे सुसह्य व आनंदी होईल यात काहीच शंका नाही असे प्रतिपादन माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी केले. जुना सातारा, शिवसेना विभागीय कार्यालयात जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील यांनी माहिती दिली व नोंदणीस सहकार्य केले.
यावेळी माहिती देताना 44 वर्षीय जेष्ठ नागरिकांची लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली तसेच तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डीस्टन्सचे पालन करणे, शासनाच्या नियमाचे पालन करणे अशी जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली. एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार विविध प्रकारच्या 29 सवलती योजना राबवत असतात. तर विविध सामाजिक घटकांना सुमारे 33 ते 100 टक्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिल्या जाते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार जुना सातारा येथील शिवसेना विभागीय कार्यालयात एसटीच्या ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्टकार्ड मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक धांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *