भुसावळ विभागातून ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वी संचालन ; रेल्वे सेवक कोरोना योद्धा यांचे स्तुत्य कार्य ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागातून दिनांक १९.०४.२०२१ ते दिनांक २०.०५. २०२१ पर्यंत ०८ ऑक्सिजन एक्सप्रेस चे परिचालन करण्यात आले आहे.
त्यातील एका ऑक्सिजन एक्सप्रेसने भुसावळ विभागातील मधील नाशिक स्टेशन येथे ४ ऑक्सिजन टँकर्स (६५. २९ टन ऑक्सिजन ) उतरवण्यात आले आहे. भुसावळ विभागीय रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून टँकर्स उतरविण्यात आले आहे.
प्राणवायूच्या पुरवठ्यात येणारे सर्व अडथळे दूर करत व अडचणींवर मात करत, देशभर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचे काम भारतीय रेल्वेकडून अविरत चालू आहे.

भारतीय रेल्वे कोविडच्या विषम परिस्थितीत देशातील लोकांना मदत करण्यासाठी पुढे येऊन ऑक्सिजन एक्सप्रेस च्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी द्रव ऑक्सिजन ने भरलेले टँकर सतत घेऊन जात आहे. यामध्ये भुसावळ विभागामध्ये दिनांक २४.०४.२०२१ ला नाशीक रोड येथे विशाखापटनम येथून ४ ऑक्सिजन टँकर असलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आली त्यामध्ये रेल्वे कर्मचारी यांनी आपला अनुभव सांगितला आहे कि हे कार्य करताना त्यांना रेल्वेसेवक तथा कर्मचारी
बरोबरच कोरोना योद्धा म्हूणन त्यांना आलेले त्याचे अनुभव सांगितले .

“मला आनंद आहे कि आम्ही रेल सेवक या महामारी मध्ये देश सेवा करण्यासाठी मागे नाही आहे” –
आर के कुठार ,स्टेशन प्रबंधक नासिक रोड.

ऑक्सिजन ट्रेन करीता काम करणे खूप सुखद अनुभव होता आणि नागरिकाना ऑक्सिजन पुरवठा करून जिवंत ठेवण्यासाठी काम करणे ही एक मोठी संधी होती .
कुंदन महापात्रा मुख्य वाणिज्य निरीक्षक

ऑक्सिजन एक्स्प्रेस गाडयांना वेगाने व सुरळीतपणे प्रवास करता येण्यासाठी रेल्वेरूळ खुले ठेवले जात असून अतिशय काटेकोरपणे नियोजन करून विशेष सावधगिरी बाळगली जात आहे – .वि के मीना लोको पायलट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *