भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 02101/02102 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेषची आठवड्यातून चार दिवसांची असलेली वारंवारता कमी करून आठवड्यातून दोन दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार:
ट्रेन क्रमांक 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष दि. २४.५.२०२१ ते २८.६.२०२१ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच मंगळवार आणि शनिवारी (सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार ऐवजी) चालविण्यात येईल.

ट्रेन क्रमांक 02102 हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २६.५.२०२१ ते ३०.६.२०२१ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच गुरुवार आणि सोमवारी (सोमवार, बुधवार, गुरुवार आणि रविवार ऐवजी) चालविण्यात येईल.
प्रवाशांना कृपया याची नोंद घ्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे .
–


