कोविड लसीकरणासाठी रोटरी क्लब ताप्ती व्हॅली चा पुढाकार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

गेल्या एक वर्षापासून कोविंड विषाणूमुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे यावर उपाययोजना म्हणून 100% लसीकरण होणे गरजेचे आहे यासाठी शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली
यांनी पुढाकार घेतला असून लवकरच लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी दिली

शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या वतीने समाजोपयोगी विविध उपक्रम राबविल जात असतात आरोग्य, स्वच्छता व जनजागृती या विषयावर विविध उपक्रम राबवून भुसावळ ताप्ती व्हॅलीने आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे तसेच लसीकरण केंद्रावरती मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून सोशल डिस्टन्स पाळले जात नाही यामुळे शासनसरावरून काही सामाजिक संस्थांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे यामध्ये भुसावळ शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांना कोविड-19 लसीकरण केंद्र सुरू करायला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी परवानगी दिली. सदर लसीकरण सर्व समुदायासाठी खुले असेल. ICMR च्या मार्गदर्शक सूचनांच्या आधीन राहून लसीकरण करायचे आहे.
सदरील लसीकरण केंद्र नवशक्ति आयुर्वेदालय टीव्ही टॉवर ग्राऊड जवळ, भुसावळ येथे सुरू करण्यात येणार आहे. हे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी पुढाकार घेऊन सर्वतोपरी सहकार्य केले. यासाठी उपप्रांतपाल धर्मेंद्र मेंडकी प्रेसिडेंट सुधाकर सनंसे सेक्रेटरी राम पंजाबी संजय भटकर खजिनदार मुकेश अग्रवाल योगेश इंगळे जीवन महाजन प्रदीप सोनवणे किशोर पाचपांडे सुनील वानखेडे आदी ची बैठक संपन्न झाली यावेळी लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली

लसीकरण केंद्र सर्वांसाठी खुले
शहराची लोकसंख्या व त्या तुलनेत लसीकरण केंद्र कमी असल्याने केंद्रावरती गर्दी होते तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती असल्याने रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या वतीने शहरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची संकल्पना समोर आली असून शासनाच्या नियमांचे पालन करून लवकरच केंद्र सुरू करण्यात येणार आहे
राजीव शर्मा माजी प्रांतपाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *