रिक्षाचालकांनी रिक्षामध्ये पारदर्शक कागद लावावा – सहा. पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील प्रवाशी वाहतुक करणाऱ्या सर्व रिक्षा मध्ये १७ मे पासून पारदर्शक (ट्रांन्सपरन्स )
कागद लावावा तसेच प्रवाशी वाहतुक करणारे रिक्षा व इतर वाहनाचे चालक यांनी आपला गणवेश परिधान करुन शासनाने दिलेले कोविड -१९ चे अनुषंगाने दिलेल्या प्रवाशी वाहतुकीचे मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन भुसावळ शहर वाहतूक शाखेतर्फे सहा. पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी केले आहे .
सध्या राज्यासह जिल्ह्यात कोविड -१९ या आजाराची साथ मोठया प्रमाणात सुरु आहे.
सदर आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस
अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत
गायकवाड , यांनी शहरातील रिक्षा चालक व इतर प्रवाशी
वाहतुक करणारे वाहन यांचे प्रतिनिधी यांची शहर वाहतुक शाखा भुसावळ येथे १५ मे रोजी
कोविड -१९ चे अनुषंघाने मिटींग घेण्यात आली .
प्रवाशी वाहतुक करणारे रिक्षा व इतर वाहनाचे चालक यांनी आपला गणवेश परिधान करुन शासनाने दिलेले कोविड -१९ चे अनुषंघाने दिलेल्या प्रवाशी वाहतुकीचे मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन
करुन रिक्षा मधील चालकाचे मागिल बाजुस व प्रवाशांचे समोरील बाजुस पारदर्शक (ट्रांन्सपरन्स )
कागद त्वरीत लावावे सदर
पारदर्शक कागद लावल्यामुळे चालक व प्रवाशांमध्ये सपंर्क
येणार नाही. त्यामुळे कोविड -१९ चा प्रसार होणार नाही. मात्र
पारदर्शक कागद लावला नाही तर सोमवार दि १७/०५/२०२१ पासुन मोटार वाहन कायदया प्रामणे तसेच लॉकडाऊनचे उल्लघन केल्या बद्दल विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व रिक्षा चालक
यांनी कोविड-१९ या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणुन शासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन
करुन कोविड -१९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *