भुसावळ खूनप्रकरणी एका संशयिताची चौकशी – 

भुसावळ –

शहरातील आंबेडकर नगरातील रहिवासी सुनील इंगळे (28) या तरुणाच्या खूनप्रकरणी त्याचा मित्र शाहबाज शाह याला अटक करण्यात आली. यानंतर अन्य तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोघांना सोडून देण्यात आल्यानंतर एकाची पुन्हा सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती डीवायएसपी तथा तपासी अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. शिवीगाळ केल्याने शाहबाज शाह याने सुनील इंगळे त्याच्यावर चाकूने वार करत व दगड मारून खून केला. याप्रकरणी अटकेतील शाहला रविवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या घटनेत शाहसोबत असून कोण सहभागी होते? याची माहिती काढणे सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *