ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला लोकवर्गणीतून औषधे उपलब्ध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये कोविंड सेंटर उभारण्यात आले असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना काही प्रमाणात औषधे बाहेरून आणावे लागत असल्याने लोकवर्गणी गोळा करून ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी औषधी उपलब्ध करून दिली. सदर औषधी
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते मंगळवार रोजी रुग्णालयास देण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्वांच्या सहभागातून मदत व्हावी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे ,प्राध्यापक सुनील नेवे,पुरुषोत्तम नारखेडे,वसंत पाटील, दिनेश नेमाडे, संदेश सुरवाडे,किरण कोलते,राजकुमार खरात, प्रमोद पाटील, प्रशांत अहिरे, बोधराज चौधरी, हाजी मुन्ना तेली, शेख शफी शेख अजीज, अमोल पाटील, मुकेश गुंजाळ, मुकेश पाटील अशांनी लोकवर्गणी गोळा करून ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी औषधी उपलब्ध करून दिली.ही औषधी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी,माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *