18वर्षावरील लसीकरण म्हणजे निव्वळ पोकळ अभियान – शिशिर जावळे यांचा आरोप ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र दिनाचे निव्वळ औचित्य साधून 18 ते 44 वयोगटातील सर्वाना लसीकरणाचे अभियान राबविण्याचे ठरविले. शासनाने सदर वयोगटातील लोकांना साठी लस उपलब्ध केल्यात आणि म्हणून लागलीच दिनांक 28 मे 2021 पासून महाराष्ट्रातील अठरा वर्षाच्या वरील लाखो लोकांनी कोवीन ॲप वर नाव नोंदणी केली आहे.व दिनांक 1 मे 2021 रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात 18 वर्षावरील लोकांनी लसीकरणासाठी राज्यात सर्वच लसीकरण केंद्रावर गर्दी केली.पण त्यातही स्लॉट बुकिंग साठी नागरिकांना दिवस रात्रं मोबाईल, कॉम्प्युटर,इंटरनेट वर डोळे फोडावे लागत आहे आणि अशातच एकीकडे 45 वर्षावरील लोकांना शासनाच्या कोट्यातील प्रथम व दुसरा डोसच्या लसीकरणासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याने शासन नाचे लसीकरणाचे नियोजन पूर्णपणे फेल होत असताना दिसत आहे. शासनाने त्यांचेकडील उपलब्ध असलेल्या लसी ह्या फक्त त्यांच्या सोईनुसार, राज्यातील विविध जिल्ह्याना तोंड पाहुन कमी जास्त प्रमाणात पाठविल्यात. आणि अशातच राज्य सरकारने राष्ट्रीय लसीकरण अभियानातर्गत राज्यातील 45 वर्षावरील नागरिकांना त्यांचेकडील उपलब्ध 18 ते 44 वयोगटासाठी उपलब्ध डोसेस मधून देण्याचं योजिले असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकार ला 1मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वाना मोफत लसीकरण अभियान हा फक्त एक मेगा इव्हेन्ट काही मोजक्या दिवसांसाठी साजरा करायचा होता का?राज्य सरकारचे 18 ते 44लसीकरण अभियानाचे नियोजन परिपूर्ण नसताना हे अभियान सरकार ने राबविण्याचा अट्टहास का घातला?? हे फक्त एक औपचारिक अभियान होते का? राज्य सरकारने सर्वात आधी 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण अभियान सुरु असताना जाणूनबुजून कुठलेही नियोजन नसताना 18 ते 44 वयोगटातील अभियान मध्येच का सुरु केले?? 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठीचे हे राज्यसरकारचे अभियान म्हणजे फक्तपोकळ मेगा इव्हेन्ट असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *