रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळच्या सहकार्याने निळकंठ सनांसे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या शंभर झाडांची लागवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे सहकार्याने आज दिनांक सात मे रोजी भुसावळ ग्रामीण रुग्णालय च्या परिसरात ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या सुमारे शंभर झाडे लागवडीचा शुभारंभ करण्यात आला , ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्माण करणारी झाडांची कमतरता पाहून रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली च्या पुढाकाराने निळकंठ नामदेव सनंसे गुरुजी यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या सहकार्याने परिसरात ऑक्सीजन निर्मिती करणारे झाडे जसे की वड पिंपळ औदुंबर जांभूळ कडूनिंब अशा सुमारे शंभर झाडांची लागवडीचा शुभारंभ श्री सनांसे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर बी.एच.चाकूरकर उपस्थित होते यापूर्वी देखील रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली मार्फत ग्रामीण रुग्णालयासाठी सुमारे दोन लाख खर्च करून ४० बेड साठी ऑक्सिजन प्रणाली ची व्यवस्था करण्यात आली होती
त्यानंतर हा वृक्ष रोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे सदर परिसर प्रदूषण रहित व सुंदर होईल यासाठी डॉक्टर चाकूरकर यांनी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली चे आभार मानले .
लावलेली झाडे जगवण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती पाण्याची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली मार्फत केलेली असून झाडे जगवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे यावेळी रोटरी क्लब ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष सुधाकर सनान्से यांनी सांगितले यावेळी किशोर पाचपांडे, विजय आंबेकर , सुखदेव भारुडे डॉक्टर सिद्धेश पाटील अजय अंबेकर डॉक्टर प्राजक्ता तळेले मनोज भोईटे शेखर आंबेकर , इलियास शेख , वेदांत सनांसे ,राहुल आंबेकर , उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *