भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण भारतात सह महाराष्ट्रात कोरोना आणि थैमान माजव लेले आहे . यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि अनेकांचे मृत्यू झाले. कोरोनाने आणि लहान-मोठा गरीब-श्रीमंत कोणालाही सोडले नाही. कोरोनाविषाणू समूळ नायनाट व्हावा, मृत्यूदर कमी व्हावा, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने18ते 44 वय वर्षापर्यंतच्या सर्वांना एक मेपासून जशी प्राप्त होतील तसे मोफत लसीकरण करण्याचे ठरविले. आणि म्हणून लागलीच दिनांक 28 मे 2021 पासून महाराष्ट्रातील अठरा वर्षाच्या वरील लाखो लोकांनी कोवीन ॲप वर नाव नोंदणी केली आहे. दिनांक 1 मे 2021 रोजी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्याला 18 ते 44 पर्यंत लोकांच्या लसीकरणासाठी तक्रारीनंतर जळगाव जिल्ह्यालातील विविध तालुक्यातील विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर थोड्या थोड्या प्रमाणात आता लस वाटप सुरु असून लसीकरण सुरू आहे. तदनुसार आजपावेतो कोवीन ॲप, आरोग्य सेतू ॲप, वर 18 ते 44वयोगटातील अनेकांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. नावनोंदणी करणारे प्रत्येक जण ज्यावेळेस आरोग्य सेतू ॲप, कोवीन ॲपवर लसीकरण केंद्रावरील लस उपलब्धता चेक करतो तर सदै व त्याठिकाणी सदर लसीकरण केंद्रावर काही सेकंदांमध्ये वय वर्षे 18 ते 44 वयोगटातील सर्वांचं लसीकरण बुकिंग झालेले दर्शविण्यात येत आहे . त्यामुळे सर्वांना आपले काम धंदे सोडून दिवसभर मोबाईल वरती आणि लॅपटॉप वरती इंटरनेट वरती ऑनलाईन कायम नजर ठेवावी लागत आहे. सदर वयोगटातील लसीकरणाच्या उपलब्धतेची माहिती सदर अप वर वेबसाईट वर रात्री बे रात्री सकाळी केव्हाही कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी अपलोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. यामुळे शेवटी हा ते पण होऊन संबंधित वयोगटातील लोकांमध्ये लसीकरणाच्या आणि लसीकरणाच्या नियोजनाच्या अभावामुळे सदर लस न घेतलेलीच बरी अशी भावना निर्माण होत आहे. एकीकडे शासन जनजागृती करा असे म्हणते आणि एकीकडे शासनाचा लसीकरण वाटपात आणि नियोजनामध्ये प्रचंड अभाव दिसून येत आहे त्यामुळे जनतेत प्रचंड उदासीनता निर्माण होत आहे. सर्वांनाच या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.आणि म्हणून वय वर्षे 18 ते 40 वयोगटातील सर्वांचे नियोजन बद्ध लसीकरण व्हावे यासाठी शासनाने त्वरित युद्धपातळीवर सदर वयोगटातील लसीकरणाच्या उपलब्धतेची माहिती, कोविन ॲप, आरोग्य सेतू ॲप, वगैरे संबंधित वेबसाईट वरती एकाच विशिष्ट वेळेला अपलोड करून सदर माहिती अपलोड केली असल्याचा एसएमएस संबंधित वयोगटातील नोंदणीकृत आयडी जनरेट झालेल्यांना पाठवावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांचेकडे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



