वरणगाव (प्रतिनिधी )-
वरणगाव येथे शिवभोजन केंद्राला भेट देण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आले असता येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांनी कोविड केअर सेंटर बाबतची मागणी आमदार चंद्रकांत पाटिल यांचेकडे लावून धरली. यावेळी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर व विश्वस्त मंडळाचे विश्वस्त सदस्य देखील उपस्थित होते.
कोविड केअर सेंटर बाबत विश्वस्त मंडळाने पुढाकार घेवून त्यांचे लोक कल्याण रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले व तशा आशयाचे पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद व प्रशासन नगरपरिषद यांना दिले .
सदर कोविड केअर सेंटर सुरू व्हावे यासाठी आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी ,जिल्हा शल्य चिकित्सक ,प्रांताधिकारी , भुसावळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्वरित कोविड केअर सेंटर सुरू करण्याची विनंती केली असता ती त्वरीत मान्य झाली असून सदर बाबतीत जिल्हा निबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याशी देखील आमदार पाटील यांनी चर्चा करीत रुग्णालयाची इमारत त्वरित खाली करून देणेबाबत सूचना केल्या व त्यांनी मान्य करून इमारत त्वरित खाली करून देतो असेही सांगितले याबाबत शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सा कार्यालयात जाऊन डॉक्टर जयकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व रुग्णालयाची इमारत ताब्यात घेऊन त्वरित कोविड केअर सेंटर सुरू करावे व रुग्णांना दिलासा द्यावा याबाबत विनंती केली आहे .
प्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बी डी पाटील व चंद्रकांत हरी बढे सर यांनी सदर इमारतीत रुग्णालय सुरू करणे बाबत सहमती दर्शवली व आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्याशी चर्चा करून पत्र सादर केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन विश्वस्त मंडळाचे चंद्रकांत हरी बढे सर , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एडव्होकेट मनोहर खैरनार , उपजिल्हा संघटक शिवसेना जळगाव विलास मुळे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी , क्रांतिसूर्य महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष माळी , जिल्हा शल्य चिकित्सक आंकडे उपस्थित होते.
चर्चा होऊन ते त्वरित आदेश काढून दोन दिवसात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही करणार आहेत असे चर्चे अंती ठरले या वेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन सादर करण्यात आले .
जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन सादर–
कोविड – १९ साथीच्या आजार या राष्ट्रीय आपत्ती काळात वरणगाव तालुका भुसावळ येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे यामागणीसह .
आज देश राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोविड – १९ या साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज दुसऱ्या लाटेमध्ये इतका हाहाकार माजला असतांना, वरणगाव या नगरपंचायत कार्यरत असलेल्या सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या ठिकाणी व या शहरास सुमारे २१ ग्रामीण खेडे लागू असताना वरणगाव येथे कोविड केअर सेंटरची सुविधा नाही तसेच या परिसरातील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत नागरिक भुसावळ बोदवड येथे कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी जाण्यास तयार नाही, त्यामुळे असे नागरिक परिसरातच फिरत असतात अशा बाधितांची नोंद घेऊन त्यांना केअर सेंटर मध्ये दाखल करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच वरणगाव येथे धर्मादाय कायद्यांतर्गत असलेल्या बंद स्थितीतील ‘लोक कल्याण रुग्णालय’ रुग्णालयाची इमारत वैद्यकीय साहित्य सामग्री रिकामी पडली असताना अशा आपत्ती काळात, लोक साथीने बाबतीत आजाराने मरण्याचे आकडे दिवसेंदिवस वाढत असताना आणि पुन्हा तिसऱ्या लाटी चे संकट डोक्यावर असातांना निव्वळ तांत्रिक अडचणी निर्माण करून एखाद्या शासकीय प्रशासकीय व निमशासकीय इमारतीची सेंटर उघडने अत्यावश्यक आहे.
पासून अडवणूक करण्यासाठी राजकीय द्वेष बुद्धीने विरोधाची कृती करून लोकांना व बाधितांना मरण्यावर सोडून देण्याची कृती करणे व कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या कार्यात नाहक हरकत अडथळा निर्माण करणे म्हणजे या राष्ट्रिय आपत्ती/संकट काळात लोकांचे मरणास कारणीभूत असणारे सदोष मनुष्यवधाच्या पात्र ठरू शकतात.
म्हणुन आणखी अधिक वेळ न दडवता वरणगाव नगर परिषदेस त्यांच्या मागणी नुसार कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात यावीअशी मागणी करण्यात
आली आहे.
सदर निवेदनावर समाधान महाजन मनोहर खैरनार , चंद्रकांत बढे सर , विलास मुळे , सुभाष चौधरी आणि संतोष माळी यांच्या स्वाक्षरी असून प्रसंगी ते सर्व उपस्थित होते .



