मुंबई –

१. मुंबई ते दानापूर एकमार्गी (वन वे) विशेष अतिजलद
01353 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस १०.५.२०२१ रोजी ००.४५ वाजता (९/१०.५.२०२१ च्या मध्यरात्री) सुटेल व दुसर्या दिवशी ०५.३५ वाजता दानापूरला पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर.
संरचना : २२ द्वितीय आसन श्रेणी.
२. मुंबई – गोरखपूर वातानुकुलीत विशेष
01355 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ११.५.२०२१ रोजी १६.४० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.
01356 विशेष गोरखपूर येथून दि. १३.५.२०२१ रोजी सकाळी १५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २०.५० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, वाराणसी, मऊ, भटनी.
संरचना : १ प्रथम वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १३ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार.
आरक्षण : पूर्णतः आरक्षित असलेल्या 01353 आणि 01355 या विशेष गाड्यांचे बुकिंग दि. ८.५.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


