भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना स्प्रेड रोखण्यासाठी शहरातील अॅपे रीक्षा, मिनीडोअर व अन्य खाजगी प्रवासी वाहनांच्या चालकांसह या वाहनांतून प्रवास करणार्या प्रवाशांची बुधवारी शहर पोलिस ठाणे व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. पोलिस पथक व आरसीपी जवानांच्या मदतीने 126 चालक आणि प्रवाशांच्या चाचणीतून एक प्रवाशाचा रीपोर्ट पॉझीटीव्ह आला. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 59 टेस्टपैकी एक तर बाजारपेठच्या हद्दीत 67 चाचण्यांपैकी एकही बाधीत आढळला नाही. नगरपालिका आरोग्य विभागाला डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे दिलीप भागवत व कर्मचार्यांनी बंदोबस्त दिला.



