केंद्र सरकारने पुनर्विचार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ; वरणगाव मराठा समाजाच्यावतीने निवेदन ;

वरणगाव –

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस ,ई , बी , सी वर्गातील आरक्षणा बाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने केंद्र सरकारने याचा पुनर्विचार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे आशा मागणीचे निवेदन शहर मराठा समाजाच्या वतीने वरणगाव पोलीस स्टेशनला देऊन मागणी करण्यात आली आहे

     महाराष्ट्र शासनाने मागच्या काळात मराठा समाजाचे सामाजीक आर्थिक सास्कृतीक सर्वेक्षण करून आरक्षणा सदर्भात स्थापन झालेल्या आयोगाच्या शिफारशीचा अभ्यास करून समाजाला एस ई , बी , सी चे आरक्षण विभासभेत सर्वपक्षीयाच्या मदतीने मंजुर करून दिले होते या आरक्षणाच्या विरोधात त्रयस्थ अर्जदारानी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते त्या सर्दभात दि ५ मे रोजी आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्या न्यायालयाने दिला तसेच आरक्षण देत असताना ५० % ची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधारही नाही समाजाचे शैक्षणीक किंवा सामाजीक दृष्ठया मागास शोषीत करता येऊ शकत नाही असे स्पष्ट केले आम्ही सर्वेच्चा न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो परंतु न्यायालयाने निकाल देताना भारतातीत इतर राज्याचा विचार का केला  नाही हा समाज्या पुढे मोठा सवाल असुन देशातील राज्यस्थान , तामीळनाडू  येथे ५० % मर्यादा ओलाडून आजही आरक्षण सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला या सदर्भात शंका उपस्थीत होत असुन केद्र सरकारने पुनरविचार करीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीचे निवेदन वरणगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले 
  यावेळी दिपक मराठे , योगेश पाटील ,अनिल पाटील , धीरज देशमुख, भागवत पाटील , मनोज देशमुख , ज्ञानेश्वर पाटील , . भास्कर गवळी , प्रशांत पाटील , शरद देशमुख , निलेश पाटील ,अतुल शेटे , सदिप पाटील , सदाशिव पाटील , यांच्यासह असंख्य मराठा समाज बाधव उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *