भुसावळ
(प्रतिनिधी )-
आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजसेवेसाठी ख्यातीप्राप्त संस्था रोटरी क्लबच्या प्रांत 3030 ने विविध क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरी केल्याबद्दल भुसावळ निवासी रोटरी क्लब भुसावळचे ज्येष्ठ सदस्य रो.पांडुरंग राव यांना प्रांत 3030 चे प्रांतपाल रो. शब्बीर शाकिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकतेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

समाजाच्या आणि माणुसकीच्या भले करण्याचे उद्दीष्ट; रो.पांडुरंग राव
रोटरी परिवरातील हा अत्यंत बहुमोल पुरकार समजला जातो. कार्यक्रमदारम्यान रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे उपप्रांतपाल रो. धर्मेंद्र मेंडकी यांनी रो.पांडुरंग राव यांचा परिचय दिला. प्रांतपाल रो. शब्बीर शाकिर यांनी रो.पांडुरंग राव यांचे जीवन म्हणजे सगळ्यांसाठीच एयक आदर्श असून, जीवनात अडीअडचणीच्या प्रसंगी तसेच रोटरी मार्फत समाजसेवा करतांना रो.पांडुरंग राव यांचा आदर्श घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे असे सांगितले. रो.पांडुरंग राव हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे ही त्यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रो.पांडुरंग राव यांनी आपण आयुष्यभर कुठल्याच कौतुकाची अपेक्षा आणि लाभाचा मोह न धरता समाजाच्या आणि माणुसकीच्या भले करण्याचे उद्दीष्ट ठेवून वाटचाल केल्याचे सांगितले.
रोटरी परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण:
रोटरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित रो.पांडुरंग राव म्हणजे रोटरीचा चालता बोलता ज्ञानकोश असून प्रचंड प्रशासनिक आणि बौद्धिक क्षमता बाळगणार्या व्यक्तिमत्वाला दिल्या गेलेल्या पुरस्काराने एकूणच रोटरी परिवारात प्रचंड आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. गजानन ठाकूर आणि सचिव रो. गिरीश कुलकर्णी यांनी पांडुरंग राव यांना मिळालेला सन्मान ही क्लबच्या दृष्टीनेच नाही तर एकूणच समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. राव साहेबांचे कर्तुत्व एखाद्या पुरस्करपेक्षा कैकपट मोठे असले तरी योग्य व्यक्तिला योग्य बहुमान मिळाल्याचा आनंद काही औरच असतो अशी रो. गजानन ठाकूर, रो. गिरीश कुलकर्णी तसेच रोटरी क्लब भुसावळ च्या सर्वा सदस्यांची भावना असून सगळ्यांनी पांडुरंग राव यांचे कौतुक केले आहे.


