भुसावळ रेल्वे विभागातर्फे आवाहन – कोणीही जुना आणि बनावट व्हिडिओ शेअर करु नये तसेच कोविड-१९ संबंधित सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-

भुसावळ विभागातर्फे सर्वांना, जुना आणि बनावट व्हिडिओचे सामायिक (sharing) न करण्याचे आणि कोविड-१९ शी संबधीत योग्य वर्तनाचे अनुसरण करण्याचे आवाहन करण्यात आले

विविध स्थानकांवर गर्दी दर्शविणारे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत होत आहेत. काही बातम्यांमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात मूव्हमेंट होत असल्याचा खोटा उल्लेखही करण्यात आला आहे. रेल प्रशासन प्रत्येकाला असे व्हिडिओ सामायिक (sharing) न करण्याचे आवाहन करीत आहोत. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती आहे.

कोविड-१९ च्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत याविषयी कोणतीही तर्क/अनुमान करणे टाळावे.

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तर्फे उन्हाळ्यात जास्त गाड्या चालविण्यात येत असतात तसेच पुरेशी तिकीटे उपलब्ध असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी कंफर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.

भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य प्रकारे ( मास्क ) मुखपट्टी घालण्याचे, आपले हात साबणाने / पाण्याने स्वच्छ धुण्याचे व कोविड-१९चा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग राखण्याचे आवाहन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *