यावल ( प्रतिनिधी )
येथे भारतीय जनता पक्षाचा ४१वा स्थापन दिवस पक्षाचे नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाचे थोर दिवगंतांच्या प्रतिमांचे पुजन करून साजरा करण्यात आला दिनांक ६ एप्रील१९८o या दिवसी पक्षाची स्थापना करण्यात आली होती . यावल येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पीटल येथील संपर्क कार्यालयात आज भारतीय जनता पक्षाचा ४१ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपा यावल तालुका अध्यक्ष तथा माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे , नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमाता , छ्त्रपती शिवाजी महाराज , पंडीत दिनदयाल उपाध्याय, डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी , भारतत्न पंतप्रधान स्व . अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येवुन त्यांना आदरांजली अपर्ण करण्यात आली, याप्रसंगी भाजपाचे यावल शहराध्यक्ष डॉ निलेश गडे, परेश नाईक, स्नेहल फिरके , राहुल फेगडे ,भाजयुवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी , भालशिवचे गोपाळ तायडे आदी कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला .



