भुसावळ (प्रतिनिधी )-
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम प्रशासनाचा भाग म्हणुन पेंशन अदालत (I) जून 2021 दिनांक 15/06/2021 (मंगळवार) सकाळी 11 वाजता भूसावळच्या मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात ऑनलाइन आयोजीत केली आहे. पेंशनरशी मोबाइल वर संपर्क करून ई मेल द्वारे पेंशन धारकांच्या तक्रारींचे शासनाच्या वर्तमान दिशानीर्देशानुसार तत्परतेने निराकरण केला जाईल .
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातुन जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यानी आपल्या तक्रारींचे अर्ज वरिष्ट मंडळ कार्मिक अधिकारी, भुसावळ यांना ऑनलाइन ईमेल – bslpensionadalat12021@gmail.com वर सादर करावेत, अर्जात आपले नाव, पदनाम, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरुप इत्यादि नमुद करावे, व अर्जासोबत पास बुकची झेरॉक्स, पी. पी. ओ ची झेरॉक्स, आधार कार्ड ची झेरॉक्स स्व सत्यापित करून PDF फ़ाइल मधे उपरोक्त ई मेल वर पाठवावे ।
अर्ज जमा करण्याची अंतीम तारिख 30/04/2021 (शुक्रवार) मध्यरात्रि 12 वाजेपर्यंत राहील . असे पत्रकानव्ये कळविले आहे .



