फैजपूर (प्रतिनिधी )-
येथील दिनिज जोशीने कॉस्ट अँड मॅनेजमेंट या परीक्षेतील इंटरमिजिएट लेवल मध्ये सर्वोत्तम यश संपादन करीत परिसरात नावलौकिक मिळविला आहे .
फैजपूर येथील कै. जयंत सुरेंद्र जोशी यांचा दिनिज हा सुपुत्र असून आपल्या घरच्या सामान्य परिस्थितीमध्ये हे यश संपादन करून आई निलिमा जोशी यांना आनंदाची आणि समाधानाची भेट दिली आहे . ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट ऑफ इंडिया संस्थेमार्फत घेतली जाते. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत त्याने ऑनलाईन क्लास जॉईन करून अभ्यास करीत यश संपादित केले. आत्मविश्वास एकाग्रता आणि नियमितपणा या त्रिसूत्री नियमांचे पालन आपल्या यशाच्या आमूलाग्र बदल घडविण्यास मदत केली असून त्याच्या यशाचे श्रेय आई, भाऊ, शिक्षक व मित्रपरिवारास देतो.
या यशाबद्दल त्याचे मित्र उत्कर्ष भंडारी, पल्केश वाणी, प्रथमेश बाणाईत, परेश वराडे व मित्रपरिवाराने गौरव करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.



