भुसावळ (प्रतिनिधी )-
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर यांची 130 वी सार्वजनिक जयंती साजरी करण्या बाबत शासकीय विश्रामगृह येथे जयंती उत्सव समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीत सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुदाम सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे .
यावेळी भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत समाजातील सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडत कोरोनाचे संकट पाहता शासनाने निर्गमित केलेले नियम मास्क वापरणे , सोशल डिस्टनसींग पाळणे , व कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ न देता सर्व समाज बांधवांनी जयंती साजरी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे या प्रसंगी कामगार नेते जगन सोनवणे-रिपाई चे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण जाधव, विश्वास खरात, अनुप खोब्रागडे, पप्पू सुरडकर, बाळा पवार , राजू डोंगरदिवे ,
राजेश बग्गन,भगवान निरभवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .



