बोदवड –
शासनाने मका खरेदी करावा,किंवा बाजार भावातील भाव फरक द्यावे अन्यथा शासन मका खरेदी करू शकत नाही असे लेखी पत्र द्यावे या मागण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे आमरण उपोषण तहसील कार्यालया समोर सुरु करण्यात आले आहे .
बोदवड तालुक्यातील शासकीय हमी भाव मका खरेदी साठी 850 शेतकऱ्यांची नोंदणी केली गेली.
प्रत्यक्षात मात्र 60 शेतकऱ्यांचाच मका खरेदी करुन पुढील खरेदी बंद करण्यात आली.
उर्वरित शेतकऱ्यांचा मका खरेदी व्हावा या साठी शेतकरी संघटने कडून 11/1/2021 रोजी लाक्षणिक उपोषण केले गेले.त्या वेळी शासना कडून मका खरेदी सुरु झाली मात्र ही खरेदी फक्त 2 दिवसांसाठी झाली व या दोन दिवसात फक्त 15 शेतकऱ्यांचा मका खरेदी करुन खरेदी बंद करण्यात आली.
म्हणून आता उर्वरित शेतकऱ्यांचा मका खरेदी करावा,किंवा त्याना बाजार भावातील भाव व फरक द्यावे अन्यथा शासन मका खरेदी करू शकत नाही असे लेखी पत्र द्यावे या मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण तहसील कार्यालया समोर सुरु केले आहे.
या उपोषणात पुरूषोत्तम पाटिल,नाना पाटिल,राजेश पाटिल,सचिन डीके,दगड़ू शेळके यांचा सहभाग आहे.



