भुसावळ (सा वा )-
स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी तसेच, योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो हे अनेक महिलांना माहिती नाही. महिला परिवरामध्ये शोषित असतात, आपल्याला काही व्याधींनी ग्रासले असल्यास कुटुंबातील किंवा बाहेरील सदस्यापासून ते लपवून ठेवतात परिणामी आजार गंभीर होतो, मृत्यू ही संभवतो अश्या वेळेस डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असरो. या सर्व विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात यावे, यासाठी कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हायला हवी,’ असे मत डॉ.श्रद्धा चांडक यांनी व्यक्त केले. वरणगाव येथे प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेच्या वतीने तृप्ता समाधान महाजन यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
’’तिशीनंतरच्या महिलांमध्ये स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या कुटुंबातील महिलेला कर्करोग सारखा आजार झाल्यास ते संपूर्ण कुटुंब उद्वस्त होते. तसेच या आजारावरील उपचारही महागडे असल्याने सर्वसामान्यांना उपचार करणे शक्य नसते. अगदी सुरवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील २२ हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणून कर्करोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले, भविष्यात वरणगाव शहरात कर्करोग निदान शिबीर घेऊन उपचार सुरू करू असे आयोजक तृप्ती समाधान महाजन यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले. मार्गदर्शकांचा परिचय शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे यांनी करून दिला. प्रसंगी प्रमुख म्हणून शिवसेना महीला आघाडी जिल्हा संघटीका पुनम ब-हाटे उपस्थित होत्या .
परिसरातील ३०० महिला व मुलींनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
स्तनाचा कर्करोग म्हणजे काय, तो कशामुळे होतो, कोणत्या स्थितीमध्ये तो अधिक धोकादायक असतो, योग्यवेळी निदान आणि उपचार यामुळे तो पूर्णतः बरा होतो, याविषयी महिलांनी जाणून घेतले. त्याचबरोबर गर्भाशयाच्य कॅन्सरबाबतही या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, कर्करोगासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्याबद्दल महिलांनी तृप्ता महाजन व आयोजकांचे आभार मानले.
प्रसंगी शिवसेना महीला आघाडीच्या पदाधिकारी यांचेसह महिला मोठ्या संख्येने हजर होत्या .



