आरोग्य केंद्राचा 75 लाख रुपये निधी खर्च होणार ;भूमी अभिलेख कार्यालयाकडून जागेची मोजणी ; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश;

भुसावळ (प्रतिनिधी )-

शहरवासीयांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 75 लाख रुपये निधी आरोग्य केंद्रासाठी मंजूर करण्यात आला आहे भूमिअभिलेख कार्यालय आणि पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा निधी परत जाण्याच्या मार्गावर होता परंतु शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून भूमी अभिलेख कार्यालयाने तत्काळ या जागेची मोजणी केली जागेची मोजणी करणारे अधिकारी चंद्रकांत चौधरी आणि सचिन पाटील यांचा शिवसेनेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

भुसावळ नगरपालिकेत भाजपाची सत्ता तर आमदारही भाजपचेच आहेत मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य केंद्राच्या जागा मोजणी चा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे 75 लाख रुपयांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर असताना शिवसेनेने आंदोलन करून पाठपुरावा केला. यानंतर भूमिअभिलेख कार्यालयाकडून या जागेची मोजणी करण्यात आली. आता मात्र आमदार संजय सावकारे याचे श्रेय घेऊ पाहत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत कुणी अडवलं होतं का? हा निधी परत जाण्याची नामुष्की कोणामुळे ओढवली होती ? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

आमची श्रेयासाठी लढाई नाही

वस्तुतः शिवसेनेने भूमि अभिलेख अधिकाऱ्यांना फेविकॉल चा डबा देऊन आंदोलन केलं होतं यावेळी 15 फेब्रुवारीपर्यंत चा अल्टिमेटम अधिकाऱ्यांना दिला होता. त्यात पालक मंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख विलासजी पारकर, जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. आम्हाला श्रेय घेण्यापेक्षा काम होणे तसेच भुसावळकर जनतेला आरोग्याच्या सेवा मिळणे महत्वाचा आहे, अशी भूमिका शिवसेना उपजिल्हा संघटक विलासजी मुळे, जिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तमराव सुरवाडे यांनी मांडली. या जागेच्या मोजणी प्रसंगी उपजिल्हाप्रमुख ॲड श्याम श्रीगोंदेकर, शहर नीलेश महाजन, शहरप्रमुख प्रमुख बबलू बऱ्हाटे, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा उपस्थित होते.

*शिवसेनेचे खुले आव्हान*
आरोग्य केंद्राबाबत आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केल्यामुळे काम मार्गी लागल्याचे सांगत श्रेय घेतले जात आहे. भाजपचे डॉ नितु पाटील यांनी अगोदर पाठपुरावा केला होता, हे अर्धसत्य, मात्र यासाठी निधी अगोदरच उपलब्ध असताना केवळ भूमी अभिलेख कार्यालयाच्या दिरंगाईमुळे काम रखडले होते. याठिकाणी शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करून, मोजणी करण्यासाठी आली आहे. त्यामुळेच आमदार संजय सावकारे आणि शहराध्यक्ष परीक्षित बरहाटे यांनी शिवसेनेसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, खुलासा करावा अन्यथा श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रकार थांबविण्याचे आवाहन तालुका प्रमुख समाधान महाजन आणि शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने करण्यात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *