लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर दरम्यान 4 फेब्रूवारी पासून त्रि- साप्ताहिक विशेष गाडी होणार सुरु ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेने दिलेल्या तपशिलानुसार पुढील सुचना मिळेपर्यंत प्रवाश्यांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर दरम्यान त्रि-साप्ताहिक विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
*गाडी क्रमांक 02336 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस भागलपुर विशेष गाडी दिनांक 04.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवार,रविवार,मंगळवार ला लोकमान्य टिळक टर्मिनस हुन 08.05 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी भागलपुर ला 17.55 वाजता पोहोचेल.
डाउन स्टॉप- नासिक रोड-11.20/11.25, मनमाड-12.20/12.25,भुसावळ-14.50/14.55, बुराहनपूर-15.43/15.45,खंडवा-20.07/20.10
*गाडी क्रमांक 02335 अप भागलपुर लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 04.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार,शुक्रवार,रविवार ला भागलपुर हुन 09.00 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस 17.50 वाजता पोहोचेल.
अप स्टॉप- खंडवा-07.58/08.00,बुराहनपूर-08.58/09.00, भुसावळ-10.00/10.05,मनमाड-12.37/12.40, नासिक रोड-13.40/13.45
संरचनाः 2 वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, 3 वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 11 शयनयान, 4 द्वितीय श्रेणी आसन
आरक्षणः पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी क्रमांक 02336 साठी आरक्षण सामान्य भाडेदराने दिनांक 03.02.2021पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होइल.
उपरोक्त विशेष गाडीच्या  थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९  शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *