भुसावळ (प्रतिनिधी )-
कौटूंबिक कलहातून जावयानेच सासर्याची हत्या केल्याची घटना 5 डिसेंबर 2020 रोजी अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमवाडी येथे घडली होती. या गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपी जावयाच्या भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरच रविवारी मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
श्रीराम बाबूराव सपकाळ (चांदूर) असे मयताचे तर मनोज शिवचरन इंगळे (कापशी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.
श्रीराम सपकाळ यांची कौटुंबिक कलहातून त्यांची जावई मनोज इंगळे यांनी 5 डिसेंबर 2020 रोजी हत्या केली होती. आरोपी मनोजचा शोध सुरू केल्यानंतर तो मुंबईत असल्याचे कळताच पथक तेथे गेले मात्र आरोपी तेथून नागपूर निसटला मात्र तेथेही तो आढळला नाही. आरोपी शिवचरण इंगळे हा भुसावळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.सी.खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.



