भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र समता शिक्षक परिषद जळगाव तर्फे महात्मा फुले स्मृतिदिन प्रीत्यर्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार तालुक्यातील जि.प. शाळा शिंदी येथील उपक्रमशिल शिक्षक समाधान रामचंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत झालेल्या कार्यक्रमात आमदार आबासाहेब चिमणराव पाटील (एरंडोल), उपशिक्षणाधिकारी विजय पवार प्राचार्य डॉक्टर एल.ए.पाटील, लेखक भरत शिरसाट, समता शिक्षक परीषदेचे राज्याध्यक्ष डी.के.अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. समाधान जाधव हे भुसावळ कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष असून विविध पदावरून सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. त्यांना नुकताच जळगाव जिल्हा परीषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे.



