वरणगाव नगरपरीषदेवर भाजपाचीच सत्ता येणार : खासदार रक्षा खडसे –


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील वरणगाव येथील भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने शिरसाळा येथील मारुती रायाला साकडे घालण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रवाना झाले.
सुमारे 35 किलोमीटर पायी संकल्प पदयात्रा भाजपने काढली. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी तळवेल फाटा बोहर्डीपर्यंत पायी चालून पदयात्रेत सहभाग नोंदवला.यावेळी खासदार खडसे म्हणाल्या की, वरणगाव नगरपरीषदेवर भाजपाची सत्ता बसविण्यासाठी माझ्याही शुभेच्छा असून प्रलंबित विकास कामे मार्गी लागल्या पाहिजे तसेच पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती भाजपाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला उठवावी लागली हे यश भारतीय जनता पार्टीचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *