भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यासाठी जिल्ह्याधिकारी जळगांव यांनी सन
2020- 2021 या कालावधीसाठी अनुक्रमांक 1 मध्ये अनुसूचित
जाती या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या सरपंच
पदासाठी तळवेल,मोंढाळा, मन्यारखेडा,शिंदी,जाडगाव, कठोरा बुद्रुक,ओझरखेडा,साकरी ह्या 8 ग्रामपंचायती अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सरपंचपदासाठी निश्चित करण्यात आलेल्या असून
यामध्ये 4 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे.तसेच
अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या
वरडसीम जोगडखोरी,मांडवेदिगर भिलमळी,साकेगाव,पिंपळगाव
बुद्रुक, वेल्हाळे, कंडारी या गावांचा समावेश
असून
सरपंचपदासाठी 6 जागा निश्चित करण्यात आलेल्या
आहे.त्यापैकी 3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले
आहे.नागरीकांच्या मागास वर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात
आलेल्या पिंप्रीसेकम,सुसरी,वांजोळे,
जोगलखेडा,फुलगाव,फेकरी,
कठोरा खुर्द , कन्हाळे
बुद्रुक,कु-हे प्र.न.,पिंपळगाव खुर्द
, काहूरखेडा या गावांचा
सरपंचपदासाठी 11 जागा निश्चित करण्यात आलेल्या
आहे.त्यापैकी 6 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले
आहे.सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित करण्यात आलेल्या
हतनूर,अंजनसोंडे,गोजोरा,
बेलव्हाय,कन्हाळे खुद्रुक, सूनसगाव,
टहाकळी,दर्यापूर,किन्ही,खंडाळे,अचेगाव,बोहर्डी,बुद्रुक,खडके
चोरवड अशा गावांचा सरपंचपदासाठी 14 जागा निश्चित
करण्यात आलेल्या आहे.त्यापैकी 7 जागा महिलांसाठी राखीव
ठेवण्यात आलेले आहे.



