भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ पालिकेच्या इतिहासात 22 वर्षानंतर प्रथमच सिंधी समाजाच्या नगरसेवकाला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली असून शुक्रवारच्या सभेत रमेश नागराणी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नागराणी यांच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी सहृदय सत्कार केला. निवडीसाठी सूचक म्हणून युवराज लोणारी तर अनुमोदक म्हणून महेंद्रसिंग ठाकूर होते.
पालिका निवडणुकीला एक वर्षांचा अवकाश असून सामाजिक मतांचा विचार करता पाच नगरसेवकांना प्रत्येकी दोन महिने उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला रमेश नागराणी यांना संधी मिळाली आहे.
निवडीनंतर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी रमेश नागराणी यांचा काच बंगल्यावर सत्कार केला. प्रसंगी गटनेता मुन्ना तेली, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, महेंद्रसिंग ठाकूर, प्रमोद नेमाडे, राजेंद्र नाटकर, पुरूषोत्तम नारखेडे, मनोज बियाणी, निकी बत्रा, मुकेश पाटील, पिंटू कोठारी, अॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, प्रा.दिनेश राठी, सोनी बारसे, मुंकेश गुंजाळ, किरण कोलते, अजय नागराणी, मंगला आवटे, अरुणा सुरवाडे, दिनेश नेमाडे, किशोर पाटील, रवी सपकाळे, वसंत पाटील, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, सतीश सपकाळे, देवा वाणी, व्यापारी अशोक नागराणी, सुदाम बठेजा यांच्यासह भाजपा नगरसेवक पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.



