मुक्ताईनगर –
माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून या वृत्ताला स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला आहे. गुरुवारी दुपारी खडसे यांची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. खडसे हे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कारने उपचारार्थ मुंबईला रवाना झाले आहेत. सुरूवातीला जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती तर त्यांच्यावर जळगावात उपचार सुरू असताना गुरुवारी माजी महसूलमंत्री खडसे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी : खडसे
खडसे म्हणाले की, कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून मुंबईत उपचारार्थ दाखल होत असून कार्यकर्त्यांसह सर्वांच्छा शुभेच्छा पाठीशी असल्याने आपण लवकरच बरे होवून पुन्हा जनसेवेत रूजू होणार आहोत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खडसे यांनी केले आहे.



