भुसावळ (प्रतिनीधी )-
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवार दिनांक १९ रोजी भुसावळ विभागातील खासदारांसह ऑनलाईन बैठक घेतली.
या ऑनलाईन बैठकीत भुसावळ विभागाच्या कार्यक्षेत्रातील खासदार नंदकुमार चौहान, प्रतापराव जाधव, डॉ.सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, उन्मेष पाटील आणि तसेच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक गुप्ता हे सहभागी झाले. वेबिनार बैठकीत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.
डी.के. सिंह, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक मणी जित सिंह, प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य अभियंता;
ए. के. तिवारी, प्रधान मुख्य विद्युत अभियंता; साकेत मिश्रा, महाव्यवस्थापकांचे सचिव; दिनेश वशिष्ठ, उपमहाव्यवस्थापक हे ह्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे उपस्थित होते.



