भुसावळातील अमर स्टोअर ते स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करा ; रिपाईच्यावतींने डीआरएम यांना निवेदन ;

भुसावळातील अमर स्टोअर ते स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करा ;
रिपाईच्यावतींने डीआरएम
भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील अमर स्टोअर्स ते स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या पदाधिकार्‍यांनी रेल्वे डीआरएम प्रशासनाला मंगळवारी निवेदनाद्वारे केली. अमर स्टोअर्स ते रेल्वे स्टेशन रस्त्याचा परीसर हा रेल्वे हद्दीत येत असून सद्यस्थितीत या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने आबालवृद्धांसह वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून रस्त्याचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना रीपांइ जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रवी सपकाळे, पप्पू सुरळकर, राहुल बिर्‍हाडे आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *