भुसावळ (प्रतिनिधी )-
कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत (नमा ) शर्मा भुसावळ यांच्या तर्फे हिंदुहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहे ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ अभिवादन करुन गोरगरीबांना अन्नदान व फराळ वाटप करण्यात आले. तसेच थंडीपासून बचावासाठी यावेळी गरीब व गरजूूना कांबळ वाटप सुध्दा करण्यात आले.

प्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अँड .जगदीश कापडे,शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक दिपक धांडे,अँड.निर्मल दायमा,जेष्ठ शिवसैनिक अबरार ठाकरे, मा.नगरसेवक अँड नरेंद्र लोखंडे, शिववाहतूक सेनेचे हेमंत खंबायत,शिवसेना विभागप्रमुख अरुण साळुंके, मिलिंद (गोलु )
कापडे,राजेश ठाकुर,शाखा प्रमुख धीरज वाढोनकर यांचेसह परिसरातील शिवसैनिक तसेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते .


