भुसावळ (प्रतिनिधी )-
पंजाब मध्ये सुरू असलेल्या किसान आंदोलन मुळे रेल्वे प्रशासन कडून गाड़ी क्र- 02715/16 नांदेड़ – अमृतसर – नांदेड़ सचखंड एक्सप्रेस ला शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले आहे.
1) गाड़ी क्रमांक – 02715 डाउन – नांदेड़ -अमृतसर सचखंड एक्सप्रेस विशेष गाड़ी ही दिनांक 16.11.2020 व 17.11.2020 ला नांदेड स्टेशन वरून प्रस्थान करेल व अमृतसर स्टेशन ऐवजी न्यू दिल्ली स्टेशन वर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
2) गाड़ी क्रमांक – 02716 अप अमृतसर – नांदेड़ सचखंड एक्सप्रेस विशेष गाड़ी ही दिनांक 18.11.2020 व 19.11.2020 ला अमृतसर स्टेशन ऐवजी नवी दिल्ली स्टेशन पासून पुढे नांदेड पर्यंत चालवण्यात येईल.
प्रवाशानी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .



