अल्पवयींन मुलीस पळवून दोन वर्षे पासून फरार आरोपी भुसावळ बाजार पेठ गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील बाजार पेठ पोलीस स्टेशन मध्ये गुरन ८१/३०१८ भादवी कलम ३६३,३७६ (३),सह बाल लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कमल ४,६,८, ११ (४),१२प्रमाणे दिनांक १८ मे २०१८ रोजी
गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्या गुप्त बातमी
वरुन फरार आरोपी रईस खान साकिम खान वय ३२ रा.कलाली वाडा जाममोहल्ला भुसावळ हा शहरात जाममोहल्ला भागातून सापळा रचून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक
डाॅ. प्रविण मुंडे ,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी ,पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे ,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. निरीक्षक अनिल मोरे ,सहा.पो. निरीक्षक मंगेश गोटला ,सहा. फौजदार तस्लिम पठाण, पो.हे.काॅ सुनिल जोशी, संजय भदाने, पो.ना.समाधान पाटील, रविद्र बिर्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील पो.काॅ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी,कृष्णा देशमुख,सचिन चौधरी, सुभाष साबळे, चेतन ढाकणे योगेश महाजन, अशानी केली असुन पुढील तपास सहा.पो.निरी. अनिल मोरे, पो.ना.समाधान पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *