भुसावळ (प्रतिनिधी )-
सर्वत्र कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजाराने थैमान माजविले आहे त्याच पाठोपाठ सध्या डेंग्यू या भयंकर आजाराने सुद्धा डोके वर काढले आहे . या पार्श्वभूमीवर येथील प्रभाग १० च्या नगरसेविका सौ मेघा वाणी व देवा वाणी यांनी पालिकेच्या माध्यमातून डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक १० मध्ये आज सोमवार दिनांक २ नोव्हेबर पासून धुराळणीला सुरुवात केली आहे .
यामध्ये आज काही भागात नगरसेविका मेघा वाणी, देवा वाणी, मित्र परिवार, व नगरपालिकेच्या सहकार्याने धुराळणी करण्यात आली तर उर्वरित भागात सुद्धा धुराळणी करण्यात येणार असल्याचे देवा वाणी यांनी सांगितले .



