रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे यांची भुसावळात बदली ;


रावेर –
नाशिक विभागातील निवासी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा शासनाने काढले असून यात जळगाव जिल्ह्यातील निवासी नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. यात रावेर निवासी तहसीलदार संजय तायडे यांची भुसावळ येथे याच पदावर बदली झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून संगमनेर , जि.अहमदनगर येथे एरंडोल संगायो नायब तहसीलदार मोहन सोनार यांची महसूल नायब तहसीलदार पाचोरा येथे रीक्त पदावर बदली झाली आहे. पाचोरा नायब तहसीलदार संभाजी पाटील यांची पाचोरा निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली झाली. पारोळा येथील निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांची नवापूर, जि.नंदुरबार येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून तर अमळनेर नायब तहसीलदार आर.एस.चौधरी यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *