युनियन बँकेच्या भोंगळ कारभारामुळे महिला स्वंय सहाय्यता ग्रामीण भागातील बचतगटांना खाते ओपनिंगचा प्रश्न ऐरणीवर


खडका प्रतिनिधी-

भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खडका येथील
महिला स्वयं सहाय्यता बचतगटा अंतर्गत ग्रामीण भागातील महिलाचे युनियन बँकेत कारभारामुळे महिला स्वंय सहाय्यता ग्रामीण भागातील बचतगटांना खाते ओपनिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
महिला स्वयं सहाय्यता बचतगटा अंतर्गत ग्रामीण भागातील
बचत गटातील महिलांचे जीवनमान बदलले असुन महिलांतील सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असतांना त्यांना अनेक अशा उद्योंगामुळे आर्थिक मदत झाली आहे परंतु त्यांची आर्थिक मदतीला काही गोष्टी अडसर ठरत आहे. त्यातल्या त्यात त्यांच्या बचतीचा जमाखर्च हा त्यांना बँकेच्या माध्यमातून जमवयचा असतो परंतु भुसावळ शहरातील युनियन बँकेत आधीच्या गटांचे खाते चालु असल्यामुळे नव्याने येणाऱ्या गटांना यापासुन वंचित राहावे लागत आहे तरी यामुळे सर्व ग्रामीण बचतगट महिला वर्गना बँकेतील कर्मचारी व मॕनेजर दुर्लक्ष करीत असुन उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे त्यांना नविन गंटाचे खाते ओपन करण्यासाठी नाहक ञास सोसवा लागत असल्यामुळे तरी ह्या विषयाकडे सबंधीत प्रशासनाने लक्ष घालुन ह्या महिलांचा प्रश्न मार्गी लावावा. अशी ग्रामीण भागातील महिला ओरड करीत आहे त्यांच्या अशा धोरणामुळे महिलांचा विकास होत नाहि व त्यांना आर्थिक कर्ज पुरवठा इत्यादी गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे तरी शासनाने ताबडतोब निर्णय द्यावा अशी मागणी ग्रामीण भागातील महिला बचतगटाच्या उपअध्यक्ष संगिता पाटिल,आर्थिक सखी शुभांगी धांडे,संगिता महाजन,राजेश्री महाजन,प्रतिभा महाजन,चंदा पाठक,बेबीबाई कोळी,शिल्पा सोनवणे.ग्रामसंघ अध्यक्ष अनिता बोदडे,निलीमा सरोदे,भावना सरोदे,मंदा अवसरमोल ,व वार्धिनी संघासह बचतगटाच्या सर्व सदस्य महिलांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *