भुसावळ (प्रतिनिधी )-
दिपनगर विद्युत प्रकल्पात स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलून परप्रांतीयांना काम दिली जात आहे. तर स्थानिक तरुण रोजगारासाठी दारोदार भटकंती करीत आहे. त्यामुळे यापुढे ६६० मेगावॅट प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी प्रकल्प समोर निदर्शने करण्यात आली.
दीपनगर औष्णिक विज निर्मित केंद्रातील ६६० मेगावॉट प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेना यांनी दिपनगर प्रशासनाला निवेदन दिले होते. यानंतर प्रकल्पासमोर घोषणाबाजी करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची मागणी केली. प्रसंगी मनसे शहराध्यक्ष विनोद पाठक व महिला शहरप्रमूख रीना साळवी, यावल शहरप्रमुख व महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेना अध्यक्ष मनीष चवरे, उपाध्यक्ष सुरेश कांबळे उपस्थिती होते.



