भुसावळ तालुका वकील संघातर्फे हाथरस प्रकरणाचा तीव्र निषेध ; पीडितेस वाहिली श्रद्धांजली ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १४ सप्टेंबर रोजी घड़लेल्या माणूसकीला काळिमा फासणाऱ्या बलात्कार व हत्याकांडाचा भुसावळ तालुका वकील संघातर्फ आज शनिवार रोजी तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून पिडितेस श्रद्धांजली वाहण्यात आली . तसेच सीबीआयतर्फे मागणी करून फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली .
दुर्घटने नंतर स्थानिक प्रशासनाकडून झालेली पीडित परिवाराची हेळसांड आणि मीडियाची मुस्कटदाबी या सारख्या अक्षभ्य अपराधाचा भुसावळ येथील वकील संघांने तीव्र निषेध केला.सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मीडियाला रोखणाऱ्या असंवेदनशील सरकारचा तसेच रातोरात निर्भयाचा अंतिम संस्कार करून गुन्हेगारांना
अक्षभ्य देणाऱ्या सरकारचा
सुद्धा निषेध करण्यात आला. तसेच कथित प्रकरणाची सीबीआय चौकशी होऊन सदरचा खटला आरोपी विरुद्ध उत्तर प्रदेश सोडून देशाच्या अन्य न्यायालयात चालविण्यात यावा पीडित परिवाराला संरक्षण देण्याची मागणी भुसावळ वकील संघ करीत आहे निर्दयी आरोपी विरुद्ध खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी भुसावळ वकील संघ करत आहे.
याप्रसंगी अध्यक्ष अँड.तुषार पाटील,महिला प्रतिनिधी
अँड.जास्वंदी भंडारी ,अँड चित्रा आचार्य,अँड.सुचिता बैसवाल,अँड.विजया कारडे,अँड. सुमन सपकाळे,अँड.संगीता चंदन,अँड.संजय तेलगोटे,यांचेसह वकील संघ सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *