स्व.हरीभाऊ जावळेंच्या जयंती निमित्ताने 3 रोजी ‘ आठवणीतले हरीभाऊ ‘ कार्यक्रमाचे आयोजन ; केंद्रीय मंत्री नितिन गडकरी , प्रकाश जावडेकर , संजय धोत्रे देणार आठवणींना उजाळा ;


यावल –
माजी आमदार तथा खासदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे याची 3 ऑक्टोबर रोजी जयंती असल्याने आठवणीतले हरीभाऊ या व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील भालोद येथे कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचा तर्फे करण्यात आले आहे . स्व.हरीभाऊ जावळे यांचे वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य शिबिर , पुस्तक दान , बेटी सन्मान अश्या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरे केले जात असत.
स्व.हरीभाऊ जावळे यांचे दुखःद निधन झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच जयंती आहे . त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींच्या स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज , आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री, भक्तीप्रकाशदास शास्त्रीजी , स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे . माजी महसूल यांची ऑनलाईन उपस्थिती या कार्यक्रमात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी , केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर , केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे , निती आयोग सदस्य नरेंद्र जाधव , जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील , माजी पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन , मंत्री एकनाथ खडसे , माजी संघटन मंत्री भाजप रवीजी भुसारी हे स्व.हरीभाऊ जावळे यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत . यावेळी बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके , जैन इरीगेशनचे अशोक जैन , खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , माजी खासदार उल्हास पाटील , भाजप जिल्हा अध्यक्ष राजूमामा भोळे , संघटन मंत्री विजय पुराणीक , शरद ढोले , संघटन मंत्री किशोर काळकर , व्हेंचर क्यापीटलीस्ट भरत खेमका , युदेशी अग्रो संचालक मनुभाई उदासी हे सदर कार्यक्रम प्रसंगी ऑनलाईन उपस्थिती देणार आहेत . हा कार्यक्रम स्व.हरीभाऊ जावळे मित्र परिवार या फेसबुक पेजवर लाईव्ह प्रसारीरत करण्यात येणार आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळून आणि योग्य ती काळजी घेउनच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे आयोजक कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचारमंच तर्फे कळविण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *