रेल्वे प्रवाशांना दोन अतिरीक्त गाड्यांचा दिलासा –
भुसावळ

रेल्वे प्रवासात प्रवाशांची वाढती गर्दी पाहता पुन्हा दोन गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. खुर्दा रोड ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाडी चालवण्यात येणार आहे ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून कन्फर्म तिकीटानंतरच रेल्वे प्रवाशांना त्यात नियमांचे पालन करून प्रवेश दिला जाणार आहे.
खुर्दा रोड ते अहमदाबाद विशेष गाड़ी
अप 08407 खुर्दा रोड ते अहमदाबाद विशेष गाड 30 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहुन 10.40 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी 3.20 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, भरूच, बडोदा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 08408 अहमदाबाद ते खुर्दा रोड दरम्यान 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबदरमयान विशेष गाडी दर शनिवारी रात्री 12.15 सुटल्यानंतर दुसर्या दिवशी खुर्दा रोडला 2.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, बडनेरा, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, शिरपूर कागज नगर, मंचेरीयल, रामागुंडम, वरंगल, विजयवाडा, एल्लुरु, राजमुदरी, अनकापल्ली, दुववादा, कोठावलसा, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, ब्रहमपुर आदी ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, नऊ स्लीपर, पाच द्वितीय आसन श्रेणी डबे जोडण्यात येणार आहेत.


