भुसावळ (प्रतिनिधी )-
राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी भुसावळचे माजी नगराध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार संघटना बळकटीकरण, नवीन तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करण्यासाठी राज्य ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी ही नेमणूक केली आहे.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
यापूर्वी उमेश नेमाडे यांनी पक्ष संघटनेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस भुसावळ शहराध्यक्ष, युवक जिल्हा सरचिटणीस युवक जिल्हा संघटक, फादर बॉडी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष आदी पदांवर कार्य केले आहे. पक्ष वाढ व बळकटीसाठी प्रयत्न केल्याने त्यांच्याकडे आता विभागीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमेश नेमाडे यांच्या निवडीनंतर विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराती, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप सोनवणे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, महाराष्ट्र प्रद्रेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास भाऊसाहेब पाटील, युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जळगाव शहराध्यक्ष अभिषेक पाटील आदींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



