प्रा.दीपक शिरसाट यांना पीएच.डी.पदवी प्रदान ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ कला , विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील इतिहास विभागात कार्यरत असणारे प्रा.डॉ.दीपक शिरसाट यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे “गोवा मुक्ती आंदोलनात मराठी वृत्तपत्रांच्या भूमिकेचा ऐतिहासिक अभ्यास (इ. स.1945 -इ. स. 1961 )” या विषयात संशोधन केल्याबद्दल पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.त्यांना शेंदूर्णी येथील प्रा.डॉ.प्रशांत देशमुख यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या यशाबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन
महेश फालक, सचिव विष्णु चौधरी, खजिनदार संजय नाहाटा, प्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन. इ. भंगाळे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.प्रफुल्ल इंगोले व प्राध्यापक मंडळींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *