कर्जाच्या आमिषाने महिलांची एक लाख 89 हजारात फसवणूक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवरून संपर्क करीत कर्जाची मागणी करणार्‍या महिलांची एक लाख 89 हजारात फसवणूक झाल्याची घटना 15 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या काळात घडली.शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आपणास कर्ज पाहिजे आहे का अशी जाहिरात वृत्तपत्रात आली होती. या जाहिरातीतील संबंधित मोबाईलनंबर वर संपर्क साधला असता कर्ज सुरक्षा पॉलीसीच्या नावे घेऊन तुम्हाला सहा महिला एकत्र करून गट करावा लागेल त्यावेळेस एक ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज पुरुष, महिला, लघुउद्योग आदी व्यवसायासाठी सुलभतेने दिले जाईल, असे सांगून यासाठी पहिले काही रक्कम तुम्हाला भरावी लागेल असे सांगीतले व महिलांकडून एक लाख ८९ हजार रुपये बँक खात्यात जमा करून घेतले, मात्र नंतर त्या महिलांना कर्ज दिले नाही, संबंधित महिलेने मोबाईल क्रमांक लावून पाहिला असता तो नंबरच लागत नाही, यामुळे महिलांनी वारंवार नंबर लावल्यावर सुद्धा संबंधित व्यक्तीशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाली आहे, असे या महिलांचा समज झाल्यावर महिलांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्याकडे झालेल्या फसवणूकीची सविस्तर माहिती त्यांना दिली. महिलांची फसवणुकीची माहिती ऐकून घेतल्यानंतर विशाखा सुनिल शिंदे (रा. गडकरी नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *