भुसावळ विभागात सर्व स्थानकांवर “स्वच्छ नीर” साजरा; पिण्याच्या पाण्याची केली तपासणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे विभागात शनिवार रोजी स्वच्छता पंधरवड्याखालील सर्व स्थानकांवर “स्वच्छ नीर” साजरा करण्यात आला. शेख अस्लम जावेद सहाय्यक मंडल यांत्रिक अभियंता भुसावळ यांनी स्वच्छता पंधरवड्यात स्वच्छता जागृती विषयावरील वेबिनार आयोजित केले होते. गूगल मीटवरील या वेबिनारमध्ये जी आर अय्यर स्टेशन संचालक भुसावळ आणि युनूस अन्सार मकनू एडीएमई-तृतीय / बीएसएल यांच्यासह स्टेशन मॅनेजर, मुख्य आरोग्य निरीक्षक, डेपो प्रभारी आणि स्वच्छता पखवाडाशी संबंधित कर्मचारी उपस्थित होते. मनमाड स्थानकात अखिल भारतीय एसटीएससी रेल्वे इंडिया कर्मचारी संघटनेच्या सदस्याने स्टेशन परिसराची साफसफाई केली.
भुसावळ विभागातील क्लीन नीर थीम अंतर्गत नाशिक, मनमाड, खंडवा, अकोला, अमरावती, बुरहानपूर, बडनेरा, चाळीसगाव, देवळाली, मलकापूर, मूर्तिजापूर, पाचोरा, शेगाव इत्यादी स्थानकांवर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *