अग्रिम पार्सल बुकिंग १२० दिवस आधी होणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल प्रशासनद्वारा  व्यापारी , व्यावसायिक यांच्या सुविधेसाठी विशेष यात्री गाड़ी तथा विशेष पार्सल गाड़ी चे एस एलआर
(SLR) आणि पार्सलयान मधे 120 दिवस अग्रिम मधे आपले पार्सल ची  जागा आरक्षित करण्याची सेवा शुरू केलि आहे
या योजने च्या अतर्गत व्यापारी आपला पार्सल यातायात पाठवण्यासाठी 120 अधिस्थान आरक्षित करू शकता . विशेष यात्री गाड़ी तथा विशेष पार्सल गाड़ी चे एस एलआर (SLR )आणि पार्सलयान मधे पार्सल वहन हेतु स्थान आरक्षित करण्याची सुविधाच्या अतर्गत वहन करण्या साठी लागणारे  अपेक्षित पूर्ण पार्सल भाड्याच्या १० टक्के रक्कम भरून पार्सलकरिता स्थान आरक्षित करता येणार आहे. . बाकी ९० टक्के पार्सल भाडे गाडीच्या निर्धारित  सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. जर ग्राहक गाडीच्या निर्धारित  सुटण्याच्या ७२ तासांपूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही तर पार्सलची अग्रिम बुकिंग रद्द करण्यात येईल आणि अग्रिम पार्सल भाडे भरलेले १० टक्के जप्त केले जाईल
याच प्रकारे , विशेष यात्री गाड़ी तथा विशेष पार्सल गाड़ी मधे मागणी नुसार पार्सलयान ची बुकिंग पण १२० दिवस अगोदर बुक करता येणार आहे. याकरिता वैगन  पंजीकरण शुल्क भरावे  लागणार आहे.
७२ तासांपूर्वी रद्द करता येईल बुकिंग
जर पार्सलसाठी बुक केलेली जागा रद्द करावयाची असेल तर  गाडी सुटण्याच्या ७२ तास आधी रद्द करता येईल . अशा परिस्थितीतही ग्राहकाला भरलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम परत मिळेल; परंतु ७२ तासानंतर ग्राहकाला असे करता येणार नाही. तसेच काही कारणास्तव जर रेल्वे प्रशासन द्वारा गाडी रद्द केली तर ग्राहकाला त्याने भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल.
व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी रेल्वेच्या या नव्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि रेल्वे द्वारे पार्सल बुकिंग  करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून आपल्या सामानाकरिता जागा सुरक्षित करावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *